जॉर्डन
जॉर्डन : अल् मामलाका अल् उर्दुनीया अल् हशमिया. नैर्ऋत्य आशियातील एक अरब देश. क्षेत्रफळ ९५,५९४ चौ. किमी.; लोकसंख्या २३,४८,००० (१९७१). याच्या उत्तरेस सिरिया, पूर्वेस इराक व सौदी अरेबिया, आग्नेयीस व दक्षिणेस सौदी अरेबिया आणि पश्चिमेस इझ्राएल आहे. राजधानी अम्मान.